बाप्पाला निरोप
निरोपाची घटिका जवळी आली |
बाप्पा हुरहुर मनातली या वाढली ||
यावर्षीचा सण तुझा |
फारसा नाही करता आला साजरा ||
गौरी ही अगदी शांततेत आल्या |
मुरड घातली सर्वांनीच हौसे मौजेला ||
बाप्पा चुटपुट ही लागून राहिली |
निघायची वेळ तुझी होत आली ||
काय सांगू अन् काय नको |
बाप्पा यावेळेला तू जाऊच नको ||
आधार तुझाच फक्त या परिस्थितीला |
तुझ्या ऐवजी विसर्जन करूया कायमचंच त्या करोनाला ||
तो किंचित हसला आणि म्हणाला….
इच्छा असली तरी असं करता येणार नाही |
काळ बदलला तरी शास्त्र बदलणार नाही ||
हो रे बाप्पा…. कळतंय सगळं |
पण काय करावं समजत नाही ||
निरोप तुला देताना कंठ आला दाटून |
पण मन काही मानत नाही ||
आता तूच काय ते बघ |
आणि सोडव या प्रश्नाला ||
वेळ आहे थोडा |
पण घेऊन जा या महामारिला ||
नृपाली जोशी
नवीन पनवेल
९८२२३३०४४८






Be First to Comment