उत्सव यंदाचा
बाप्पाच्या आगमनाची
चाहूल लागली,
आहे त्या सामानात
सजावट ही झाली,
बँड, ढोल ताशांची,
शांतता ती खटकली,
कोरोना मुळे हौसेला
मुरड ती घातली,
होईल तसा प्रत्येकाने
थाट तो मांडला,
बाप्पाच्या आवडीचा
मोदक मात्र तो केला,
बाप्पाच्या आगमनाने
उत्साहाला उधाण आले,
त्यातच सारेजण जरा
कोरोनाला विसरले,
बाप्पा या वर्षीचा हा उत्सव
साधेपणाने केला रे,
गोड मानून घेऊन एक वरदान दे रे,
पुढच्या वर्षीचे आगमन
धूमधडाक्यात होऊ दे रे.
नयना पेंढारकर, नवीन पनवेल






Be First to Comment