सणांचा आनंद?
पाहुण्यांचे आगमन गौरी गणपती चा सण
नातवंडांनी गजबजून जाई आज्जी चे अंगण
नवीन कपडे घालून आमचे घरभर मिरवणे
आजी ने मात्र सोवळ्यात सारे स्वयंपाकघर व्यापणे
शिरकाव तिथे करणे शक्यच नसायचे
लाडू , पुरण पोळी अन मोदकाच्या वासाने पोटात कावळे ओरडायचे
सगळं काम करून दमूनगेलेले आज्जी चे पाय रात्री चांगलेच बोलायचे
सणांचा मनमुराद आनंद घेणे तिचे राहूनच जायचे
कधी कधी आई ला चार दिवस बाजूला बसावे लागे
नैसर्गिक चक्र खरं तर , त्यानेच घडविलेले
त्यालाच ते का बरं न चालावे ?
खटके तिचे देवा पुढचे वावरणे ,ना चाले नवेद्य तिच्या हातचा
तिच्या बाप्पा ला तिने दुरूनच हात जोडायचा ?
माझ्या ह्या साऱ्या प्रश्नांचा भडिमार व्हायचा
सणांचा खरा आनंद घ्यायचा तिचा राहूनच जायचा
रूढी , परंपरेचा वारसा आज्जी ने दिला आईला
पुरणपोळी , मोदक आजही सोवळ्यात नैवेद्य देवाला
आता माझी लेक असेच प्रश्न पुन्हा विचारे तिच्या आज्जीला
प्रश्नांचा भडिमार आता पुन्हा होणार
सणांचा खरा आनंद घ्यायचा तिचाही राहूनच जाणार
शीतल उमेश कुलकर्णी, विचुंबे






Be First to Comment