वंदुया गौरीसुताला
गणपतीराया, तू विघ्नहारी,
कृपा कर तू या पामरांवरी…
सूर्याचे तेज आहे तुझ्या मुखी रे
जास्वंदी फूल वाही तुझ्या पायी रे
सुखकर्ता तू, तू दु:खहर्ता
वंदुया आता प्रथमेश्वराला…
दुर्वांचा वास आहे तुझ्या शिरी रे
वाहनासी उभा आहे सेवेकरी रे
मोदकांचा थाट आहे नैवेद्याला
वंदुया आता लंबोदराला…
बुद्धीची देवता तू गणपती रे
संकटी स्मरता तू जनांसी तारी रे
मंगलमूर्ती तू, तू सिद्धिदाता
वंदुया आता मयुरेश्वराला…
भक्तांची आस तू गणपती रे
सदैव त्यांच्या तू पाठीशी रे
करुनि चरणी नित्य प्रार्थना
वंदुया आता गौरीसुताला…
श्वेता जोशी, नवीन पनवेल.






Be First to Comment