आस…
तुझ्या आठवांचा मनी मोद सारा
जसा मोरपंखी फूलावा पिसारा
तुझ्या आठवांनी पुन्हा प्रीत व्हावे
जणू अंतरीचा असे हा इशारा
मनी साद देती नवी स्पंदने ही
जणू मीलनाची असे तीच ग्वाही
तुझ्या आठवांनी जुळे सूर आता
जणू गीत माझे तुझे रूप पाही
असे ही परीक्षा खऱ्या संयमाची
मनी ती प्रतीक्षा तुझ्या मीलनाची
परी अंतरी त्या व्यथा आज साही
असे ही कहाणी तुझ्या आठवांची
अशी ही अवस्था कुणाही कळेना
परी आज चिंता मनाची सुटेना
तुझ्या स्वागताचे नवे गीत होई
परी सूर कंठी समेसी जुळेना
©समीर खरे, पनवेल
8879737388






Be First to Comment