Press "Enter" to skip to content

मला पहायचे आहे

मला पहायचे आहे

दिवा वंशाचा आमच्या तू
ही वाट तूला चालायची आहे
प्रकाश या वाटेवरती मी रुजवला,
ती तुलाच सजवायची आहे.॥

आज तू अन मी दोघे साक्षिदार दोन पिढ्यांचे,
वाटेवरच्या वृक्षांना सांगायचे आहे
अनेक वादळवा-यांना मात देत
खंबीरपणे उभारायचे आहे. ॥

वाटेवर पेरलेल्या अनेक काट्यांना,
पावलांनीच रगडायचे आहे.
कठिण खडतर मार्ग मग कसा सुलभ होतो….
हे जगाला दाखवायचे आहे.

तुझे ते उदात्त, उन्नत रुप,
डोळे भरुन मला न्याहाळायचे आहे
हे आशिर्वाद शिरावरी घेऊन तू विहान,
यशस्वी झालेले मला पहायचे आहे. ॥

धनंजय गद्रे, पाली
08983576287


Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.