ताई
ताई ही आई सारखीच असते
तिच्यासारखी कोणीच नसते
भांडणातही गोडवा जाणवतो
त्यातही आपलेपणा असतो…
लहानपणी घेतलेली काळजी
आयुश्यभर आठवत राहते
आठवणी आठवताच डोळ्यात
टचकन पाणी तरळून येते…
लहानपणीच्या आपल्या खोड्या
तिलाच बरोबर माहीत असतात
आई-बाबां पासून त्या खोड्या
ताईने लपवलेल्या असतात…
मोठे होता तिची काळजी वाढते
नात्यातील वीण अजून घट्ट होते
सासरी गेल्यावरही लक्ष असते
चुकल्यास ओरडणे चुकत नसते…
ताईचा वाटतो कायमचा आधार
कर्तव्यात तिचा सदैव पुढाकार
अशा ताई साठी जुळतात कर
तिच्या इच्छा देवा तू पूर्ण कर…
कवी- निलेश केरकर.
( डोंबिवली पूर्व.)






Be First to Comment