अतुरता ही पहिल्या भेटीची
उत्कण्ठा ही पहिल्या भेटीची
सहज विचार आला भेटण्याचा
मनात आली माझ्या तू केव्हाची
अतुरता ही पहिल्या भेटीची……
मन कासावीस होत होते
जेव्हा तू न दिसे इथे तिथे
वेड्यापिस्या सारखा उभा जिथे
..अतुरता ही पहिल्या भेटीची.
आस होती फ़क्त तुझी
होशील तू वाटलं माझी
किती केलं प्रयत्न त्यासाठी
अतुरता ही पहिल्या भेटीची…..
पहिली भेट ही प्रत्येकाला प्रिय
आतुरता ही मनोमनी रमणीय
कधी होते भेटीचा नजराणा
अतुरता ही पहिल्या भेटीची
कधी रे संपतो एकदा हा दुरावा
मनात खंत नेहमी या कनवेची
असा क्षण येईल कधी जीवनात
अतुरता ही पहिल्या भेटीची…..
कवी
निवास गावंड
अध्यक्ष
सुयश क्लासेस आवरे
9221345869






Be First to Comment