गणू आला आमच्या घरी
गेला बरसून सुखाच्या सरी
सुरू झाली लगबग सारी
आता येईल गौराई माहेरी
गौराईच्या येण्याने मोहरते आई
दंग होते लेकीची करण्या सरबराई
गोडा धोडाची असते तिची तयारी
तीनच दिवसात परतेल सासरी
गौराई असते लक्ष्मीचे रूप
सुवासिनीना तिचे कौतुक खूप
सासरी मिळेल का प्रेमाची सावली
विचाराने नुसत्या गहिवरते माऊली
जवळ येताच पाठवणीचा क्षण
पुढल्या वर्षीचे देते आमंत्रण
गौराई पण आनंदुनी जाते
सर्वांना आशिष अन सुख-समृद्धी देते
मुग्धा पद्मनाभ भागवत, नवीन पनवेल






Be First to Comment