🔶 प्रार्थाना गणरायाला 🔷
गणपती बाप्पा तू ये रे घराला
आनंद होईल रे माझ्या मनाला
मखर सजविला देवा तुझ्या स्वागताला
ये रे तू बाप्पा माझ्या घराला …
बाप्पा येतील घेवूनी उंदीर मामाला
बेल दुर्वा वाहू बाप्पा तुझ्या चरणाला
गुण-गान गाईन रे तुझ्या आगमनाला
ठेवीन माथा बाप्पा तुझ्या चरणाला
ये रे तू बाप्पा माझ्या घराला…
बाप्पा तू दाखव रे रूप जगाला
मारुनी टाक तू कोरोणा रोगाला
आनंद सारा त्याने नाहीसा केला
दु:ख होत आहे रे साऱ्या जगाला
ये रे तू बाप्पा माझ्या घराला….
ढोल ताशा नाही वाजणार मिरवणुकीला
फेऱ्यांची गाणी नाहीत तुझ्या जागरणाला
गर्दी टाळायची आहे गरज आपल्याला
“घरी राहा, सुरक्षित राहा “ सांग तू जगाला
ये रे तू बाप्पा माझ्या घराला….
कोरोणाला घेवून जाईल बाप्पा विसर्जनाला
आरोग्य लाभेल रे पुन्हा आपल्या घराला
आनंद होईल रे साऱ्या जनाला
सुखी ठेव बाप्पा लहान थोरला
ये रे तू बाप्पा माझ्या घराला……
कवी
श्री.शेखर म्हात्रे
9594183449






Be First to Comment