आगमन
होते गणपतिचे आगमन भाद्रपदात
तसे चैतन्य भरते अवघें तनामनात
आहे हे लहान थोरांचे लाडके दैवत
विविध रूपातही मनमोहक भासतं
फळ-फुल अन् अरासाने आसन सजतं
कार्पुर,धुपा- दीपाने परिसर घमघमतं
ढोल ताशे,सनाई चौघडेच्या तालात
मंत्रोच्चारणही होते एका तालासुरात
विद्येचा देव ,नावही तयासी ते शोभतं
नको धनादेश फक्त भक्तिभावही पुरतं
इच्छापूर्ति करण्यास नित्य ते सरसावतं
सद्भावना फक्त अन्य काही मागण नसतं
जो तो रूप साजिरं डोळ्यांत साठवतं
मंगलमय व्हावें हे प्रत्येकजण इच्छितं
गणपति बाप्पा मोरया
संगीता देशपांडे, नवीन पनवेल






Be First to Comment