Press "Enter" to skip to content

कुणबी जात

कुणबी जात

हताशा लागते हाती
निराशा लागते हाती
ठिकाणा चुकतो बबा
की चूकत्या सदा वाटी

हारतो रोजचा डाव
नव्याने सोचतो राती
म्हणाया भाकर साधी
ती ही आत्वे पोटासाठी

खेळ संसाराचा जड
होई खेळताना कधी
दिवाळी रोज जीवाची
दारिद्र्यांच्या पेटे वाती

नित्य पाच वेळा तरी
तुझे हे नाम रे ओठी
सोडवशील तू कधी
नशीबाच्या आटआटी

उधार्यात खर्च होते
की कर्जात सावकारी
संकटांना वजा करी
त्यांचा दर चक्रवाढी

न येवो ईश्वरा कुणी
अरे या कुणब्या जाती
मरण्याआधीच जणू
हाडांची होते या माती

मोबीनमोसीन, पैठण

9511704491

One Comment

  1. Mahesh Mahesh August 20, 2020

    Nice one mosin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.