सुंदर सृष्टी व मानव
सृष्टी सुंदर, जग ही सुंदर
अशीच राहील, धरा निरंतर.
वारे वाहती
ढग गोळा होती
पाऊस येता
भिजते माती
झाडे जगती
वेली बहरती
बघा झाडावरती
फुलेफळे लागती
प्राणी पक्षी मजेत असती
आनंदाने पिके डोलती
शेतकरी ही मनी सुखावती
निसर्गाची गाणी गाती
सृष्टी चे सौंदर्य जपती
त्यासाठी वृक्ष लावती
वृक्षसंवर्धन असे पावती
सृष्टी हिरवं लेणं लेती
एकच धर्म मानवजाती
पर्यावरणाचा समतोल जपती
निरोगी आयुष्य सर्वच जगती
नक्कीच राहील सुंदर ही धरती
सृष्टी सुंदर, जग ही सुंदर
अशीच राहील धरा निरंतर. ….
सौ जयश्री निलकंठ सिरसाटे,
गोंदिया
मो क्र 9423414686






Be First to Comment