जीवन गाणे
वाटते एकदा गाणे बनून जगावे
सूरलहरींसंगे स्वैर दूर फिरावे
शब्दांना लेवुनी अर्थगर्भ ते भाव
स्वरांत हरपुनी जावे अवघे भान
आरोहाचा भव्य उत्कट तो बिंदू
सायुज्याचा परमोच्च तो सिंधू
अवरोहाचा गूढ खोल तो अर्थ
करुणेला लाभे सार्थ भावार्थ
किती रसांनी सजते गाणे
लेवुनी सप्तसूर तराणे
श्वासाच्या द्रुतमंद लयीत
गाणे हे विहरे धुंद त्या सयीत
गीत बनुनी जीवन जगता
अवघे जीवन गाणे व्हावे
कवयित्री: स्वाती लेले,
नवीन पनवेल
Be First to Comment