माझ्या काव्यात तू
आहे तुझाच भास सर्वत्र
माझ्या श्वासात तू
झुळूक होऊनी थंडगार
वाऱ्यासम येतोस तू
प्रभाती बनुनी रविकिरण
अवनी वर उतरसी तू
माझ्या मन मंदिरात
सारे चराचर व्यापूनी तू
तृणावरल्या दव बिंदूतही
मोत्या सम भासतोस तू
बनुनी राजकुमार हृदयावर
राज्य करणारा तू
तुझ्यात मी हरवुनी
माझं अस्तित्व जपणारा तू
बनुनी अक्षरांची गुंफण
माझ्या काव्यातील शब्द तू
जिद्द तू , माझी उमेद तू
माझ्या जगण्याची ताकद तू
स्वप्न ही तू, माझे सत्य ही तू
माझ्या जगण्याची दिशाही तू
©️ कवयित्री सोनम जयंत ठाकूर






Be First to Comment