Press "Enter" to skip to content

मनसेच्या वतीने मराठी लेखणीचा सन्मान ; मराठी भाषा दिनाचा स्तुत्य उपक्रम

मराठी भाषेतील वृत्तपत्रांमध्ये गेली अनेक वर्ष लिखाण करणाऱ्या पेण मधील पत्रकारांचा सन्मान

पेण, ता. २८ (वार्ताहर) : कवी कुसुमाग्रजांच्या जयंती निमित्ताने संपूर्ण राज्यभरात मराठी भाषा गौरव दीन साजरा केला जात असतानाच पेणमध्ये सुद्धा मनसेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी मराठी भाषेतील वृत्तपत्रांमध्ये आपल्या लेखणीद्वारे गेली अनेक वर्ष लिखाण करणाऱ्या पत्रकारांचा म्हणजेच मराठी लेखणीचा सन्मान केला.

यावेळी बोलताना संदीप ठाकूर यांनी सांगितले की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा सिंहाचा वाटा आहे.त्यामुळे त्यांची शिकवण आम्हाला सन्मानार्थ असून आपल्या मराठी भाषेच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये वृत्तपत्राच्या साह्याने भौगोलिक, धार्मिक, सांस्कृतिक, बौद्धिक, शैक्षणिक आदी विषयांबाबत लेखणीतून प्रचार आणि प्रसार करणारे पत्रकार बांधव असल्याने त्यांचा या मराठी भाषा दिनानिमित्त सन्मान करण्यात आला आहे.यावेळी मराठी भाषा दिनाचे फलक तयार करून त्यावर मराठी भाषेबाबतचे मत लेखणीद्वारे उमटविण्याचा अतिशय स्तुत्य उपक्रम राबविल्याने त्याला देखील चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला.

यावेळी मनसेच्या पेण तालुका अध्यक्षा गौरी वोरा, उपतालुकाध्यक्ष प्रसाद पाटील, नितेश पाटील, विजय पाटील, पंकज पाटील, सौरव पाटील, वाशी विभाग अध्यक्ष सुहास पवार, नमस्कार भगत, कल्पेश सकपाळ, नयन रोडेकर, अजिंक्य गावंड, विवेक घरत, जगदीश ठाकूर, रुपेश म्हात्रे, कल्पेश पाटील, नेत्रा रोडेकर आदी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.