Press "Enter" to skip to content

महाड हाफ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

महाड हाफ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद ; बिर्ला ओपस पेंट्सचा उपक्रम दिमाखात पार

महाड : रघुनाथ भागवत

बिर्ला ओपस पेंट्सतर्फे आयोजित महाड हाफ मॅरेथॉनची दुसरी आवृत्ती आज प्रचंड उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात धावपटूंच्या सहभागाने यशस्वीरीत्या संपन्न झाली. काकरतळे मैदानावर पहाटे ५ वाजता धावण्याची सुरूवात होताच संपूर्ण शहरात आरोग्य, फिटनेस आणि ऐक्याचे उत्साही वातावरण पसरले होते.

मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणारी

मॅरेथॉनसाठी बिर्ला ओपस पेंट्सचे वरिष्ठ अधिकारी विशेष उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांमध्ये COO अजीत कुमार, VP ऑपरेशन्स आनंद सिंह, PR विभागाचे अरुण शिर्के, तसेच युनिट हेड महेंद्रसिंह शेखावत यांचा समावेश होता. स्थानिक प्रशासनातील मान्यवरांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून सोहळ्याची प्रतिष्ठा अधिक उंचावली होती. महाड नगर परिषद नगराध्यक्ष सुनील कविस्कर, उप-नगराध्यक्ष संदीप जाधव, तसेच पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला.

धावपटूंनी दिलेला प्रतिसाद उल्लेखनीय

२१.१ किमी हाफ मॅरेथॉनसह, १० किमी यूथ रन, ५ किमी ड्रीम रन आणि ३ किमी फन रन या सर्व श्रेणींमध्ये धावपटूंनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि फिटनेसप्रेमी कुटुंबांचा सहभाग पाहण्यासारखा होता.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले फिटनेस आयकॉन मिलिंद सोमन, कॉम्रेड मॅराथॉन रनर सतीश गुजरण आणि अल्ट्रा मॅराथॉन रनर सुफिया सुफी यांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावण्याबरोबरच धावपटूंना प्रोत्साहन देत प्रत्यक्ष धावण्यामध्ये सहभागी होऊन कार्यक्रमाचा उत्साह अधिक वाढवला.

विविध विभागांच्या समन्वयातून सुरळीत आयोजन

मॅरेथॉनचे नियोजन आणि अंमलबजावणी सुरळीत व्हावी यासाठी अनेक सरकारी विभागांनी एकत्रितपणे उत्कृष्ट समन्वय साधला. महाड पोलीस, सीडीओ कार्यालय, तहसील कार्यालय, महाड नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी सुरक्षा, वाहतूक नियंत्रण आणि व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच सामाजिक संस्था, भागीदार, स्पॉन्सर्स आणि महाडकरांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम आणखी भव्य व प्रभावी ठरला.

बिर्ला ओपसची सामाजिक बांधिलकी अधोरेखित

बिर्ला ओपस पेंट्सने औद्योगिक प्रगतीसोबतच समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबवले असून विविध सामाजिक उपक्रमांतून कंपनीचा सकारात्मक दृष्टिकोन ठळकपणे दिसून येतो.


‘ महाडच्या जनतेने आम्हाला दिलेला विश्वास आणि साथ आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे. स्थानिक समुदायाच्या प्रगतीसाठी आणि आरोग्यवर्धक संस्कृतीसाठी काम करणे ही आमची जबाबदारी आहे. महाड हाफ मॅरेथॉन हा एकता आणि सकारात्मकतेचा उत्सव आहे. कार्यक्रमाच्या यशासाठी मदत करणाऱ्या स्थानिक प्रशासन, संस्था आणि महाडकरांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो. ‘

अजीत कुमार, COO, बिर्ला ओपस पेंट्स

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.