
पनवेल महानगरपालिका प्रभाग १४ मधील समस्यांचा ‘ऑन द स्पॉट’ आढावा
पनवेल(प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १४ मधील प्रलंबित नागरी समस्या मार्गी लावण्यासाठी महापौर नितीन पाटील यांनी आज, (२८ फेब्रुवारी) सकाळी या प्रभागाचा विशेष पाहणी दौरा केला. प्रभाग १४ मधील साईनगर, एचओसी कॉलनी आणि परिसरातील विविध गृहनिर्माण संस्थांमधील नागरिकांनी आपल्या भागातील सफाई, कचरा व्यवस्थापन, रस्ते दुरुस्ती, सांडपाणी वाहिनी (सीवरेज लाईन) आणि पाणी समस्यांबाबत मयुरेश नेतकर यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले होते.
गेल्या पालिका निवडणुकीत या प्रभागातून भाजपचे उमेदवार पराभूत झाले असले, तरी आपल्या समस्या केवळ भारतीय जनता पक्ष आणि महापौरच सोडवू शकतात, असा ठाम विश्वास येथील नागरिकांनी व्यक्त केला. नागरिकांच्या या भावनांची दखल घेत मयुरेश नेतकर यांनी महापौरांकडे या दौऱ्याची मागणी केली होती, त्यानुसार आज सकाळी ८ वाजता या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले.
या पाहणी दौऱ्यादरम्यान साईनगर, एचओसी कॉलनी, गृहनिर्माण संस्था आणि नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी स्थानिक नागरिकांनी महापौरांचे औक्षण करून उत्साहात स्वागत केले. “आमची कामे आपल्यामार्फतच होऊ शकतात,” असा विश्वास व्यक्त करत नागरिकांनी मयुरेश नेतकर यांनाही अशाच प्रकारे जनहिताचे काम करत राहण्याच्या सूचना केल्या. या दौऱ्यात महापौरांसोबत पालिकेचे शहर अभियंता संजय कटेकर, सुधीर साळुंखे आणि आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नागरिकांच्या तक्रारी आणि सूचना ऐकून घेतल्यानंतर महापौरांनी या सर्व समस्यांचे तातडीने निराकरण करण्याचे कडक निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
प्रभागातील उर्वरित भागात देखील अशाच प्रकारचे नियोजन आगामी काळात केले जाणार असून, त्याद्वारे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याचा भाजपचा मानस आहे. नागरिकांनी आपल्या कोणत्याही समस्यांसाठी श्री मयुरेश नेतकर यांचे जनसंपर्क कार्यालय, शॉप क्र. २, श्री कृष्ण रुक्मिणी निवास, जुना ठाणा नाका, पनवेल येथे भेट द्यावी किंवा ९८२१५३१५४७ या क्रमांकावर संपर्क साधून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. याप्रसंगी मयुरेश नेतकर यांच्यासह सतीश पाटील, भाजपचे प्रभाग अध्यक्ष गणेश म्हात्रे, माजी नगरसेविका सारीका भगत, तुषार कापरे, रोहित आटवणे, सचिन गमरे आणि केदार माने यांसह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Be First to Comment