ओंजळीत बकुळ घेऊन. .
तुझ्याकडे आले. ..
तुझ्या पायावर अर्पण करून
मी धन्य झाले. ..
बकुळीचा सुवासित गंध.
चतुर्दिशे बहरुन गेले. .
नात्यांच्या या गोड बंधनात
मन प्राण हरवून गेले. ..
तुझ्या प्रेमात मी चातका सारखे
दिवस रात्र वाट पाहते…
ओंजळी भरून तुझ्या दिशेने
हळुवार पुढे येते. ….
तुझ्या प्रीतिच्या बंधनात मी हळवी झाले
तुझ्या प्रेमाचा धुंदीत मी हरवून गेले…
तुझ्या प्रीतिच्या या बंधनात. .
नाते जुळवून जाते. ..
तुझ्या मनातले माझ्या मनातले…
दोघांच्या डोळ्यात दिसते. …
अपराजिता माधव घांगुर्डे
खांदा कॉलनी






Be First to Comment