आठवणीतील शाळा……!!
चिमुकली पाखरू मी
प्रांगणात उतरली,
परिसरात शाळेच्या
अनेक खेळ मी खेळली.
झाडांची सावली घेण्या
सर्वात आधी मी धावली,
प्रार्थना ऐकताच वाटले
शाळेचे गुरूच माझी माऊली.
चाहूल माझ्या रंगांची
उतरली,
माझ्या रंगांचे स्वर्ग बघून
मीही गुरुजनांच्या मनाला भासली.
बुध्दी नाही रे माझ्या शिक्षणात
पण विचारांनी मी गोड ठरली
,चोर म्हटले आहे रे मला
कारण प्रत्येकाचे अश्रू घेऊन मी धावली.
आठवण माझ्या शाळेची रे
मनामध्ये उमलली,
चुलबुली फुलपाखरू मी
कुठेतरी शाळेतच हरवली.
– विचारधारा स्नेहा बावनकर.
कोरडी ( नागपूर) मो. नं : 9960073686






Be First to Comment