कृष्ण संदेश
साचून ठेवण्यापेक्षा मित्रा हो तू प्रवाही,
मनामधील भावनांची गड्या तूच दे ग्वाही,
कोणीकाहीच म्हणत नाही, इथे कुणाला वेळ आहे,
म्हणतील त्यांना जाऊदे, त्यांचा तोच तर खेळ आहे,
तुझ्या मनातील इच्छांना तू दाबून ठेऊ नकोस
बोलून टाक स्पष्ट, भीड कुणाची ठेऊ नकोस
नंतर अपुऱ्या अपेक्षा फक्त ओझे बनून राहतील
डोळ्यातील अश्रू फक्त तुझेच बनून राहतील
गेलेली वेळ नंतर कधी येणार नाही परतून
आठवण करत वेड्या झिझत राहशील आतून
आता केलेल्या हिमतीने हवे ते मिळवशील
काहीच केले नाही ह्या पश्चातापातून वाचशील
कर्मणी कर्तारी चा आता उगाच जमवू नको मेळ
गीतेतही कृष्ण सांगतो की हाच क्षण हीच वेळ
शेखर अंबेकर, आदई






Be First to Comment