Press "Enter" to skip to content

नंदकुमार मरवडे यांची कोरोना महामारीवर आधारित प्रबोधनात्मक कविता

सिटीबेल लाइव्ह / काव्यकट्टा #

लाँकडाऊन

कधी अनलाँक
तर कधी लाँडाऊन |
कोरोनामुळे जीवन
झाले आहे अपडाऊन ||

कुठे म्हणे कोरोना हरला

तर कुठे म्हणे वाढला |

ह्यांचाच ह्यांना आता जमेना ठोकताळा ||

मुकी बिचारी प्रजा
निमुटपणे सारे पाहते |
उद्या चांगले होईल
या आशेवर ती जगते ||

भरवसा तरी ठेवायचा कुणावर |

कारण आजची आकडेवारी उद्या बसते जीवावर ||

सारे कसे गमंतीशीर
होऊन बसलयं |
कोरोना राहिलाय बाजूला
प्रसिद्धीसाठी जो तो हपापलयं ||

श्री.नंदकुमार मरवडे,

श्री.क्षेत्र तळवली तर्फे अष्टमी, ता.रोहा-जि.रायगड. ◆◆◆◆◆◆◆◆◆

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.