गोपाळकाला
जमवूनी गोप सखांचा मेळा
कान्हाने केला गोपाळकाला
त्या काल्याची चवच न्यारी
भेदभाव विना जमती सारी
दही, दुध अन पोहे मिसळले
अधिक चवीस लवण घातले
शर्करेने मधुर प्रेम ओतले
मिसळून सारे एकची झाले
सा-या विश्वाचा हा रचीता
सा-यांचीच ह्याला चिंता
मनी वसुनी हा सखा
पार लावीतो जिवन नौका
श्रीहरीच्या त्या पावन चरणी
काम, क्रोध,मत्सराची नसे वर्णी
तमोगुण हे मनास नसावे
मनोभावे हरीला शरण जावे
मुग्धा भागवत, नवीन पनवेल






Be First to Comment