श्रीरंग
श्यामल तनु हा श्रीकृष्ण मुरारी
कुणी म्हणती गोविंद कुणी गिरीधारी
देवकीचा तान्हा झाला यशोदेचा कान्हा
गोकुळी धेनुंना फुटे वात्सल्याचा पान्हा
कन्हैयाचे लाड पुरवी यशोदा माऊली
सारे गोकुळ भासे सावळ्याची साऊली
ह्रदयात गोपीकांच्या वसे सदा श्रीहरी
सतत खोड्या करी हा नटखट मुरारी
जपला हरिने सगळ्याच नात्यातील रंग
प्रत्येकास वाटे हा तर माझाच श्रीरंग
वैशाली केतकर, नवीन पनवेल







Be First to Comment