स्वप्न रुतलेले
पापण्यांत कधी का कुणाच्या
स्वप्न सलत राहते
काळजात कधी का कुणाच्या
स्वप्न रुतत राहते।
पाहिले जेव्हा स्वप्न तिने
गंधच उकलला नाही
कोवळ्या त्या जीवाला
अर्थच गवसला नाही ।
अधिकार स्वप्न पाहण्याचा
कधीच हिरावला गेला
ओला हळवा पाऊस तिला
कोरडाच ठेऊन गेला ।
त्या घुंगराचे बोल मनावर
जखमाच करीत राहिले
पिंजारलेले आयुष्य तिचे
श्वासच मोजत राहिले ।
स्वप्नांच्या हिंदोळ्यावर बसून
तिला झुलताच आले नाही
स्वप्नांना तिच्या उमलणे
कधी ठाऊकच पडले नाही ।
योगिता भामरे
नाशिक






Be First to Comment