“हे” केल्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही गॅस सिलिंडर
सिटी बेल लाइव्ह / नवी दिल्ली #
घरगुती गॅस सिलेंडर धारकांसाठी सरकारने नवा नियम लागू केला आहे.
या नवीन नियमानुसार जेव्हा आपण आपल्या हॉकर्सला आपल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी सांगाल तेव्हाच आपल्याला गॅस सिलिंडर देण्यात येणार आहे.
या नवीन नियमामुळे इंडियन ऑइल हे सुनिश्चित करणार आहे की केवळ गॅस सिलेंडर बुक करणाऱ्यालाच गॅस सिलेंडर मिळणार आहे.
हा नवीन नियम देशातील काही मोठ्या शहरात लागू करण्यात आलेला आहे. तसेच शहरांनी आणि काही कंपन्यांनी हा नियम प्रायोगिक तत्वावर लागू केलेला आहे.
गॅस घेताना तुम्ही दिलेला ओटीपी हॉकर गॅस एजन्सीकडे वितरित करतील. तेथून कंपनीच्या नवीन एसडीएमएस तो ओटीपी सॉफ्टवेअरवर अपलोड केला जाईल. त्यांनतर तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार आहे.
Be First to Comment