ll अमृतधारा ll
अविरत ओतीत अमृतधारा
मंगल कलशा मधूनी
कृपा बरसते जणू वरुणाची
काळ्या मेघा मधुनी ll धृ llपुन्हा नव्याने सजली धजली सतेज सुंदर अवनी रविराजा पण उदास बसला दडी मारुनी गगनी ll१ll
पसरूनी पंखा सुंदर रंगीत
मोर नाचतो रानी
चकोर झेलित पाऊसधारा
हर्षित होई मनी ll२ll
शीतल परी या जलधारांनी
व्याकुळ हो विरहिणी
येईल कां तो आज ही नाही
शंकित होई मनी ll३ll
निलिमा पुराणिक, मुलुंड, मुंबई






Be First to Comment