सिटी बेल लाइव्ह / काव्य कट्टा #
क्रांतीदिन
भारत-भू चे वीर महान,
गाऊ या त्यांचे गुणगान
देशासाठी देऊन प्राण,
अमर जाहले वीर जवान…
क्रांती दिनी स्मरूया त्यांना
आठवू त्यांचे कार्य महान
संसाराची करूनी होळी,
कुणी झेलली छातीवर गोळी
कारावास कुणी भोगला,
कुणा पडे लाठीचा मार…
क्रांती दिनी स्मरूया त्यांना
आठवू त्यांचे कार्य महान
आॕगष्ट नऊ एकोणीसशे बेचालीस ,
ठरले वर्ष ब्रिटिशांना जहाल
चले जावो चा नारा देऊन ,
केले बघ त्यांना बेहाल…
क्रांती दिनी स्मरूया त्यांना
आठवू त्यांचे कार्य महान
अजय शिवकर
केळवणे पनवेल
७९७७९५०४६४






Be First to Comment