पाऊस बरसणार आहे
माझ्या घराच्या छोट्याश्या खिडकीतून
पाहते मी या पावसाला…
पाऊसच तो वेडा,
तिथूनच भिजवतो मनाला…
कधी काळी चिंब भिजायचे
मोकळ्या रानात
आताही चिंब होते , दुरूनच
किंचित तुषारात…
मन वेडे गतस्मृतीत हरवून जाते,
आजही मृदगंध
साठवून साठवून ठेवते!!!
कालचा, आजचा आणि उद्याचाही
पाऊस तोच असणार आहे…
आपली मने, आठवणी
भिजवत राहणार आहे…
कालचा गंध,आजचा वास,
उद्याचा सुगंध,
असाच आपल्या आयुष्यात
भरून वाहणार आहे…
पावसाचा सहवास
चिरंतर राहणार आहे,
आयुष्यभर, आयुष्यान्तरही
पाऊस बरसणार आहे…
पाऊस बरसणार आहे…
पाऊस बरसणार आहे!!!
सौ शरयू चिलेकर, पनवेल
Be First to Comment