101 संरक्षण साहित्याची निर्यात बंद
भारत स्वतः बनविणार हे संरक्षण साहित्य.
सिटी बेल लाईव्ह Exclusive
संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, १०१ संरक्षण सामुग्रीची आयात बंद करण्याची घोषणा भारतानं केली आहे. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्याच्या दृष्टीनं हे पाऊल उचलण्यात येत आहे.साहित्य खरेदी मधील नफेखोरी आणि परदेशी दलालांची कमीशन गिरी याला चाप बसणार आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज सकाळी १०.०० वाजता एक महत्त्वपूर्ण घोषणा करणार असल्याचं संरक्षण मंत्रालयाकडून रविवारी सकाळी सोशल मीडियावर ट्विट करून माहिती देण्यात आली होती. लडाखमध्ये वास्तविक नियंत्रण रेषेवर (Actual line of control) चीनसोबत तणावाचं वातावरण असताना संरक्षण मंत्री काय घोषणा करणार याकडे सगळ्यांचच लक्ष लागलं होतं. त्यानंतर १०१ संरक्षण सामुग्रीची आयात बंद करण्याची घोषणा करण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या ट्विटर हॅन्डलवरूनच ही घोषणा करण्यात आलीय.
संरक्षण मंत्रालयाकडून लवकरच एक ‘निगेटिव्ह आर्म्स लिस्ट‘ काढण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय. यानुसार, या संरक्षण साहित्याच्या आयातीवर बंदी घालण्यात येणार आहे. देशातील उत्पादन क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलाय.
Be First to Comment