पराजय
कोसळत होता धरणीवरही मनासारखे आकाशातून
आठवण ही थेंब होऊनी पराजय सांगत होता
शांत शीतल मोहवणारी मनातल्या विचारातून
आठवण ती माया होऊन पराजय सांगत होता
दरवळणारा सुवास मातीचा भारत होता श्वासातुन
आठवण तो शब्द होऊन पराजय सांगत होता
ओलावाही स्पर्शामध्ये दिसत होता डोळ्यातून
आठवणारा क्षण तो एक पराजय सांगत होता
सृष्टीचेही नाते सारे घट्ट होतसे हृदयातून
आठवलेल्या प्रसंगातून पराजय सांगत होता
स्वानंद नंदकुमार मराठे.
पुणे






Be First to Comment