रशिया 12 ऑगस्टला करणार कोरोना व्हायरसवरील लसीचे रजिस्ट्रेशन
सिटी बेल लाइव्ह / मॉस्को / वृत्तसंस्था #
जगभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस अधिकाधिक वाढ होत आहे. यातच रशियातून एक आशेचा किरण दिसला आहे. अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे बऱ्याच दिवसांपासून लोक ज्या कोरोना लसीची प्रतीक्षा करत होते, त्यांची ती प्रतीक्षा आता संपली आहे. हो, हे अगदी खरे आहे. आता रशिया 12 ऑगस्टला कोरोना व्हायरसवरील लसीचे रजिस्ट्रेशन करणार आहे.
उप-आरोग्य मंत्री ओलेग ग्रिडनेव यांनी शुक्रवारी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, रशिया कोरोनावरील आपल्या पहिल्या लसीचे 12 ऑगस्टला रजिस्ट्रेशन करणार आहे.ही लस, गामालेया रिसर्च इंस्टिट्यूट आणि रशियन संरक्षण मंत्रालयाने संयुक्तपणे तयार केली आहे.
सध्या, ही लस अखेरच्या म्हणजेच तिसऱ्या टप्प्यात आहे. हे परीक्षण अत्यंत महत्वपूर्ण आहे. या लसीच्या सुरक्षितते बाबत आम्हाला काळजी घ्यावी लागेल. वैद्यकीय पेशाचा आणि वरिष्ठ नागरिक लसीकरण करून घेणारे पहिले व्यक्ती असतील. ग्रिडनेव यांनी उफा शहरात एका कॅन्सर केंद्राचे उद्घाटन केले. यानंतर त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
या लसीच्या परीक्षणास 18 जूनला सुरूवात करण्यात आली होती. यात 38 स्वयंसेवकांनी भाग घेतला होता. या संर्व स्वयंसेवकांत रोगप्रतिकारशक्ती तयार झाली. यातील पहिल्या गटाला 15 जुलैला तर दुसऱ्या गटाला 20 जुलैला सुट्टी देण्यात आली होती. यापूर्वी ही लस 10 ऑगस्ट अथवा त्यापूर्वीच बाजारात उपलब्ध होईल, असा दावा करण्यात आला होता. त्यांचा हा दावा खरा ठरताना दिसत आहे.
Be First to Comment