Press "Enter" to skip to content

सिटी बेल काव्य कट्टा

कविश्री – अरुण दत्ताराम म्हात्रे. यांची स्वरचित गणेश वंदना— “मंगलमूर्ती मोरया !!”

|| मंगलमूर्ती मोरया ||
शुभ कार्यात…….शुभ प्रसंगी
तुझीच पुजा……..केली जाते
भक्तीभावाने………श्रद्धा पूर्ण
‘श्रीगणेशा’ने……सुरुवात होते …१.

शंकर-पार्वती… पुत्र गणेश तू
एकदंताय….. वक्रतुण्डाय तू
सुख देणारा…दुःख हरवणारा
मंगलमूर्ती…. बाप्पा मोरया तू –२.

हे गजानना……..वरदविनायक
तुला आवडती….. लाडू-मोदक
हे गणपती.. करता तुझी आरती
वातावरण होई….अल्हाददायक –३.

मखर शोभते…. तुजमुळे बाप्पा
येता घरी तू……. पसरते चैतन्य
चेहरे हसमुख……. नूर आगळा
तुला पाहताच…….. वाटते धन्य –४.

काय मागावे….. गणेशा तुजकडे
तू अंतर्यामी…… कर्ता – करविता
नि:स्वार्थी बुद्धी….. द्यावी सर्वांना
वंदन तुला……. हे भाग्यविधाता –५.

©® कविश्री- अरुण दत्ताराम म्हात्रे.
नवी मुंबई मो- ९९८७९९२५१९.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.