Press "Enter" to skip to content

सिटी बेल काव्य कट्टा

परिणीता

सान सानुली होती तू, नवयौवना गे झाली तू परिणीता पहाण्यासी, लग्नवेदी आसुसली

चुडा सुद्धा आतुरला, तुझ्या करि गुंफण्यासी मणी मंगलसरीही, तुझ्यासाठी आतुरली

बघ विरोळ्या जोडवी, साथ त्यांना पैजणांची नथ मोतियांसी ल्याली, साथ तिजला हि-याची

कुंकू पहा आसुसले, तुझ्या भाळावर येण्या सिंदूरही संगे आला, तुझा भांग सजविण्या

सारा शृंगार सजला, परिणीता तू गे होण्या आला स्वप्नीचा कुमार, राजकन्येला होण्या

कुंकवाच्या पाऊलांनी, उंबरठा ओलांडला गृहलक्ष्मी प्रवेशली देण्या समृद्धी घराला

सौ अस्मिता मंगेश पंडित, केळवारोड

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.