श्रावणसरी
आषाढी झंझावात सुटला
कडकडाट करी चपला
घनसरी बरसल्या वेगात
जशी लेक झेपावे माय-मिठीत
प्रेमाश्रूंचे ओहोळ लोटले
भिजल्या डोळी कातळ
न्याहाळे
सावळ्या मेघांतुन मोती
ओघळले
हिरवाईने काळ्या आईस सजविले
श्रावणाची झाली मृदु रूजवात
जशी राऊळी मंद सांजवात
आभाळी इंद्रधनू हासले
हिरव्या रानी सप्तरंग विखरले
सरी सरीतून उमटे नाद मधूर
मेघमल्हार आळवी
निसर्गसूर
ऊन पाऊस खेळ रंगला
डाव सरींनी माहेरी मांडला
डॉ. अंजली टकले,
नवीन पनवेल






Be First to Comment