वाचा कवयित्री- सोनम जयंत ठाकूर यांची कविता “बहर प्रितीचा”
बहर… प्रीतीचा !
थंडी रम्य पहाटेची वाट विरली धुक्यात
किलबिल पाखरांची पडे सुस्वर कानात...१.
गार वारा भोवताली येई अंगा शिरशिरी
अशा मंगल समयी मनी वाजते बासरी...२.
शीतवारा संगतीला अन् तुझ्या आठवणी
उलगडती अलगद भावनांच्या साठवणी...३.
देई हात हाती माझ्या राहू दोघेही आनंदी
साथ तुझी अनमोल विवाहात सप्तपदी...४.
© कवयित्री- सोनम जयवंत ठाकूर.
( वसई – पालघर )






Be First to Comment