अतिवृष्टीने उरण मधील जांभूळ पाडा येथील आदिवासी वाडीवरील एका व्यक्तीचा घेतला बळी
सिटी बेल ∆ उरण ∆ सुनील ठाकूर ∆
हवामान खात्याच्या अंदाजनुसार १५ जुलै पर्यंत पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. आणि याचा फटका उरण मधील जांभूळपाडा येथील आदिवासी वाडीतील राम कातकरी याचा या पावसाच्या जोरदार हवा आणि धुवाधार पावसाच्या तडाख्यात घर अंगावर पडून मृत्यू झाला आहे.
त्याचप्रमाणे राम कातकरी याची पत्नी, आई- वडील व चार मुले हे ही जखमी झाले आहेत. त्यांना उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती येथील आदिवासी वाडीच्या आशा वर्कर सुशीला नाईक मॅडम यांनी दिली आहे.
हा अपघात रात्री २ च्या सुमारास घडला .आणि आपत्ती- व्यवस्थापन कक्ष तिथे सकाळी हजर झाल्याचे समजते. पावसाच्या तडाख्यात सापडून उध्वस्त झालेल्या या कुटुंबाला शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी, अशी तेथील नागरिकांची मागणी आहे. अशी वेळ इतर कुणावरही आल्यास तात्काळ आपत्ती कक्षाकडे संपर्क करावा.
तहसीलदार कार्यालय
उरण येथे आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपर्क क्रमांक ०२२-२७२२२३५२/९८९२५३८४०९ रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रसिद्ध करण्यात आला आहे. तर नगरपरिषद आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष क्रमांक ०२२- २७२२२३२० या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन उरण नगरपालिका परिषदेचे मुख्य अधिकारी संतोष माळी यांनी केले आहे.
Be First to Comment