पेण गटविकास अधिकारी एम.एन.गढरी अँटी करप्शनच्या जाळ्यात
सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆
पेण पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी एम.एन.गढरी यांना १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अलिबाग रायगडच्या लाच लुचपत पथकाने रंगेहात पकडले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की याच कार्यालयातील तक्रारदार ग्रामसेवक याची मुख्यालय बदलीकरीता अहवाल रायगड जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याकडे पाठविण्यासाठी तक्रारदार याच्याकडून २० एप्रिल २०२२ रोजी २० हजार रूपयांची मागणी केली.त्यामुळे संबंधित तक्रारदार यांनी प्रभारी गटविकास अधिकारी गढरी यांची तक्रार लाच लुचपत प्रतिबंध कार्यालय अलिबाग रायगड येथे केली. त्या नुसार लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे पोलिस निरीक्षक रणजित गलांडे, पोलिस हवालदार कौस्तुभ मगर, विवेक खंडागळे, स्वप्नाली पाटील यांच्यासह अन्य पथकाने आज दुपारी तीनच्या सुमारास पेण पंचायत समिती कार्यालय येथे सापळा रचून सदर अधिकारी एम.एन. गढरी यांना पंधरा हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
यावेळी सदर अधिका-याची कसून चौकशी सुरू करण्यात आली असून या कारवाईमुळे रायगड जिल्ह्यातील इतर शासकीय अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
Be First to Comment