मंगळागौरी पुजूया
चला चला ग सयानो मंगळागौरी पूजूया
तिला गं सजवूया सौभाग्याचे वाण मागुया
चला चला ग सयानो मंगळागौरी पूजू या
सोळा पत्री अन् सोळा दुर्वां घेऊया
सोळा साळीची मुठ अन् आरास करूया
पुरणाचा नेवैद ,सोळा वातीची आरती करूया
चला चला ग सयानो मंगळागौरी पूजू या
फेर झिम्मा फुगडीचा, कीकीचे पान खेळूया
उखाण्याची फेरी अन् सखीला चिडवूया
शिव पार्वतीला जागवाया,मंगळागौरी पुजू या
चला चला ग सयानो मंगळागौरी पुजू या
संगीता देशपांडे , नवीन पनवेल






सौ.संगिता देशपांडे यांची मंगळागौर ची कविता सुंदर.
👌👌👌