कविश्री- अरुण दत्ताराम म्हात्रे. यांची स्वरचित कविता… “सदन छान स्वर्गाहुन !!”
सदन छान- स्वर्गाहुन !
म्हण ही प्रचलित आहे सर्वश्रूत…
मरणा शिवाय स्वर्ग नाही दिसत !
असेलही खरे, वा असेल ते खोटे…
पण माझे घर मज स्वर्गाहुन मोठे !
काम-धंदा-नोकरीस जाता बाहेर…
घरी परतण्यास मन असते अधीर !
रक्ताची नाती याच सदनी वसतात…
वाटेकडे डोळे लावूनी ती बसतात !
कामात-प्रवासात जो थकवा येतो…
घरी परतताच तो नाहीसा होतो !
चार भिंतीचे अनं एक छप्पराचे…
असावे गृह-सदन स्वप्न प्रत्येकाचे !
तब्येतीची काळजी हेच घर घेते…
सुखदुःखात साथ-सोबत मिळते !
चहा- पाणी- नाष्टा वेळच्या वेळी…
एकत्रित जेवणाची मजा आगळी !
सदन छोटे, किंवा असो आलिशान…
प्रत्येकास वाटे ते स्वर्गाहुन छान !!
©® कविश्री- अरुण दत्ताराम म्हात्रे.
जासई-उरण, मो. 9987992519.
Be First to Comment