सीवूड, नवी मुंबई येथे संगीतमय वातावरणात “आया वैशाखी मेळा” : “तस्करी” आणि “गोल गप्पे” चित्रपटांचे प्रमोशन
सिटी बेल • नेरूळ •
निर्वैर प्रॉडक्शन आणि व्हॅल्यू ऑफ स्माइल फाऊंडेशन, अकाल ज्योत सेवक जया आणि चारडी कला स्पोर्ट्स अँड सोशल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सीवूड, नवी मुंबई येथे मोठ्या उत्साहपूर्ण आणि संगीतमय वातावरणात “आया वैशाखी मेळा” सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
टाइम ग्रुपच्या प्रशंसित “टाइम आर्टिस्ट नेटवर्क ने या निमित्ताने पाच नवीन उदयोन्मुख संगीत प्रतिभांना लोकांपुढे आणले. यावेळी आगामी वेब मालिका आणि चित्रपट “तस्करी” आणि “गोल गप्पे” चे पोस्टर्स आणि ट्रेलरचे प्रेक्षकांपुढे अनावरण करण्यात आले.
भव्य रंगमंचावर प्रसिद्ध गायक रंधावा ब्रदर्स, मनजीत सिंग सोही आणि कबाल सरूपवाली यांनी काही चमकदार बैसाखी आणि त्यांची इतर सुप्रसिद्ध गाणी ऐकून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. रजत बंदी, अभिनेता आणि निर्माता (कोई मिल गया, पार्टनर, जोडी नंबर १, आंतरराष्ट्रीय खिलाडी), अभिनेत्री इहाना दिल्लन (राधे, भुज, हेट स्टोरी), अभिनेत्री जास्मिन भसीन (नागिन, बिग बॉस, खतरों के खिलाड़ी), एम चंद्रमौली (केजीएफच्या अध्याय १ आणि २ चे लेखक), चिता यजेश शेट्टी अभिनेता, निर्माता आणि एक्का मार्शल आर्ट तज्ज्ञ आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते सिमरजीत सिंग आणि अमृत राज सिंग आदिंची देखील या कार्यक्रमाला उपस्थिती होती.
हरदीप सिंग संधू यांच्या निर्वैर प्रॉडक्शनची पहिली हिंदी वेब मालिका ‘तस्करीच्या पोस्टरचे अनावरण कार्यक्रमात करण्यात आले. तसेच सुप्रसिद्ध अभिनेता आणि निर्माते रजत बेदी यांच्या “गोल गप्पे” या पंजाबी विनोदी चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर प्रेक्षकांना या निमित्ताने प्रथम पाहता आले. कमल मुकुट, सोहम रॉकस्टार आणि जान्हवी टेलिफिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रायफ्लिक्स एंटरटेनमेंटची निर्मिती असलेला चित्रपट आहे.
वर्ष २०१९ मध्ये स्थापन झालेल्या निर्वैर प्रॉडक्शन या निर्मितीगृहाचे सध्या विविध प्रकल्पावर कामे सुरू आहेत. सर्जनशील कलावंत असलेले हरदीप सिंग संधू यांनी त्यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक अनुभवआणि जीवनातील विविध किस्से त्यांच्या पहिल्या महत्वाकांक्षी ‘तस्करी’ साठी कशासार म्हणून पुढे आणले आहेत. या माध्यमाद्वारे संधू आणि निर्वैर प्रॉडक्शन दोहीचा अर्थपूर्ण आणि परिणामकारक कथा घडविणाऱ्या भविष्याकडे प्रवास सुरू झाला आहे. आगामी काळात निरकडून हिंदी आणि पंजाबी विश्पट प्रकल्पांची अतिशय रोमांचक मालिका येऊ घातली आहे.
वर्ष १९९२ मध्ये अनावरण करण्यात आलेला “टाइम गुप” या माध्यम समूहाने मनोरंजनातील उत्कृष्टतेचा समृद्ध वारसा आजवर निर्माण केला आहे आणि विजयपथ राजा बाबू, मॅम्बलर, खिलाडिय का बिना जोडी नंबर आंतरराष्ट्रीय खिलाडी कुरुक्षेत्र यासारखे सुपरहिट चित्रपट त्याने तयार केले आहेत.
श्री. हरदीप संधू, निवर प्रॉडक्शन्स म्हणाले; “खरच ही वाहेगुरुची कृपा आहे की करोनाच्या अशा अत्यंत क्लेशकारक भूतकाळानंतर आपण सर्वजण एक महत्त्वाचा सण आणि जीवनाला साजरे करण्यासाठी एकत्र येऊ शकलो आहोत. निर्वैर आणि व्हॅल्यू ऑफ स्माइल येथे तुम्हा सर्वांना एका अविस्मरणीय संध्याकाळचे क्षण प्रदान करण्यात आणि आमच्या आणि आमच्या भागीदारानी योजलेल्या काही मनोरंजनात्मक उपक्रमांच्या घोषणा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आम्हाला अत्यंत अभिमान व आनंद वाटत आहे. मानवजातीसाठी आणि तुम्हा सर्वांच्या मनोरंजनासाठी आमच्या सर्वोत्तम सेवा देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असेल.
श्री. प्रवीण शहा, अध्यक्ष टाइम ग्रुप म्हणाले: “योग्य कलागुणांना वाव मिळवून देण्यात टाइम ग्रुप नेहमीच आघाडीवर राहिला आहे आणि यापूर्वी तब्बू, प्रियांका चोप्रा, रजत बंदी आणि इतर अनेक कलाकारांना सिनेजगतात आणण्याचा बहुमान त्याच्याकडे आहे. हा वारसा पुढे चालू ठेऊन, “टाईम आर्टिस्ट नेटवर्क” हा त्या वारशाचा विस्तार आहे आणि आम्ही विविध कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योग्य नवोदित प्रतिभा शोधण्यात आणि जागतिक स्तरावर त्यांची प्रतिभा प्रदर्शित करण्याची संधी त्यांना प्रदान करण्यासाठी अत्यंत उत्साही आहोत.
श्रीदेवी शेट्टी, सीईओ, कौसमीडिया यांनी आता त्यांच्या सर्व कलागुणाचे व्यवस्थापन करण्यासाठी टाइम ग्रुपचेच एक अंग असलेल्या “टाइम आर्टिस्ट नेटवर्क” सोबत भागीदारी केली आहे. कौसमीडिया या निपुण टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीला १८ वर्षाहून अधिक काळ मनोरंजन उद्योगाचा अनुभव आहे आणि तिने अनेक पंजाबी चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे. श्रीदेवी या प्रतिभांचा उपयोग आणि व्यवस्थापन करेल आणि त्यांना त्यांची कौशल्ये मोठ्या कॅनव्हासवर प्रदर्शित करण्याची संधी मिळवून देण्यास मदत करतील.
श्रीदेवी शही, सीईओ, कौसमीडिया पुढे म्हणाल्या “भी टाईम ग्रुपचा भाग होण्यासाठी खूप उत्सुक आहे. आपण अशा मनोहारी काळात जगत आहोत, जेव्हा भारतातील लहान शहरातील तरुण देखील संगीत आणि इतर कलांच्या विविध शैलीमध्ये त्यांच्याकडील प्रचंड कौशल्यांचे प्रदर्शन करत आहेत. आज आपल्यापुढे आलेल्या पाच प्रतिभावंतांसोबतच, नजीकच्या भविष्यात कॉसमीडिया त्यांच्या भूतकाळातील कामाचा अनुभव आणि योग्य आगामी प्रतिभांकडे लक्ष देत भविष्यात मनोरंजनविश्वाला अशी आणखी रत्ने प्रदान करेल.
Be First to Comment