Press "Enter" to skip to content

पेण गागोदे बुद्रुक येथे बैलगाडा शर्यतींना तुफान प्रतिसाद

महाराष्ट्रात बैलगाडा शर्यती शासनाच्या नियमांना धरून सुरु राहणार — गोल्डनमॅन पंढरीशेठ फडके

सिटी बेल • पेण • वार्ताहर •

मागच्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींवर बंदी होती ती बंदी उठविण्यात यावी याकरीता संघटनेच्या माध्यमातून न्यायव्यवस्था, राज्य शासन तसेच सर्व आमदार, खासदार यांना निवेदन देऊन ही बाब अधिवेशनात सुद्धा मांडण्यात आली होती त्यानंतर सर्वांनी सकारात्मक भूमिका बजावत न्यायालयाने आम्हाला न्याय दिला आहे त्या न्यायाच्या अधिन राहून शासनाच्या नियमांना धरून महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत सुरू राहणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध गोल्डन मॅन पंढरीशेठ फडके यांनी केले आहे.

पेण तालुक्यातील गागोदे येथील लाल मैदान मंडळ आयोजित आज प्रथमच
राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते.या शर्यतींचे उद्घाटन पंढरीशेठ फडके यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी माजी आमदार धैर्यशील पाटील, सामाजिक कार्यकर्ते मंगेश दळवी, खरेदी विक्री संघाचे रघुनाथ दळवी आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, सर्व बैलगाडा शर्यत मंडळांना आवाहन आहे की शर्यतीसाठी शासनाच्या लागणा-या योग्य त्या परवानग्या घेऊनच आपण यांचे आयोजन करावे आता जरी तात्पुरत्या स्वरूपात शर्यती सुरू करण्याचे आदेश असले तरी आपण दुसरी केस न्यायालयात दाखल केली आहे. लवकरच न्यायालयाचा योग्य तो निर्णय येईल त्यांनतर शर्यती धुमधडाक्यात सूरू राहतील महाराष्ट्रातील असंख्य जनता बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी येत असते त्यामुळे त्यांचा प्रतिसाद पाहता आयोजकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक असून पेण मधील आयोजन चांगले असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.