नववर्षानिमित्त कविश्री अरुण दत्ताराम म्हात्रे यांची एक स्वरचित कविता
|| हे परमेश्वरा ||
हे परमेश्वरा देवा दीनदयाळा
तुझे आशिष तुझीच छत्रछाया
हात जोडुनी होई मन अधीर
भक्तिभावे तुज वंदन कराया.. १.
लोभस-गोजिरे पाहता ते रूप
स्फुर्तीसह मिळे आनंद-सुख
मनोभावे करता पूजा-अर्चा
पळती संकटे, सरतात दुःख.. २.
घर-देव्हाऱ्यात तू अंतरंगात
पवित्र मंदिराच्या गाभाऱ्यात
कुठे-कुठे पहावे तुज भगवंता
धरती-अंबरा तू पूर्ण विश्वात.. ३.
समाज-द्रोहींना शिक्षा मिळू दे
त्यांच्या चुका त्यांना कळू दे
किमयागार तू भाग्य विधाता
सत्त्य-सन्मार्गी त्यांना वळू दे.. ४.
सत्त्याचा वाली तूच पाठीराखा
ऐकशी दुःखी-पीडितांच्या हाका
नको निसर्गकोप नको रोगराई
तुझीच कृपा-दृष्टी तिन्ही लोका
तुझीच कृपा-दृष्टी तिन्ही लोका.. ५.
कविश्री अरुण दत्ताराम म्हात्रे. 9987992519 यांनी ‘काव्य-रुपाने’ विश्वविधात्यास केलेली प्रार्थना– हे परमेश्वरा…
Be First to Comment