शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी कोकण विभाग शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांचा पुढाकार
सिटी बेल • अलीबाग •
कोकण विभाग शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी अलिबाग येथे रायगड शिक्षणाधिकारी मा श्रीमती ज्योत्स्ना शिंदे यांची भेट घेतली.
सदर बैठकीत शाळा, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा झाली.

या बैठकीचे फलित पुढीप्रमाणे :-
१) बऱ्याच कालावधी पासून प्रलंबित असलेली आर टी ई परतावा रक्कम उद्याच शाळांच्या बँक खात्यात जमा होणार.
२) निवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित निवृत्तीवेतन फरक लवकरच निवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार.
३) शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबीत शालार्थ आयडी प्रकरणे निकाली काढण्यात आले.
४) वैयक्तिक समस्या घेऊन बैठकीसाठी उपस्थित असणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या तत्काळ सोडविण्यात आल्या.
सदर बैठकीसाठी कोकण विभाग शिक्षक आमदार श्री बाळाराम पाटील यांच्या समवेत महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना पदाधिकारी श्री रा गो पाटील, संदीप काटे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.










Be First to Comment