रक्षाबंधन
चंदनाच्या पाटावर भावाला
सोन्याच्या ताटाने ओवाळीते
अक्षता कपाळावरच्या ब्रम्हांला
ज्योत ओवाळीते भाऊरायाला…..
फिरवते लावण्य सोन्याला
बांधते धागा भावाला
सांगते भावाच्या मनाला
आपुली कीर्ती ऊरुदे….
कळूदे या विश्वाला
धागा बांधला मनगटाला
धार दे तुझ्या तलवारीला
राहा तत्पर रक्षणाला….
सांगते तुला भाऊरायाला
सण हा रक्षाबंधनाचा आला
नको अंतर कधी नात्याला
माहेरची साडी पाठव बहिणीला….
जाग आपुल्या संस्कृतीला
विश्व् बंधुता या संकल्पनेला
मान दे स्त्री जातीला
रूप माझंच स्त्री वर्गाला….
ओरडून सांग मानवजातीला
सांभाळा विश्वातील बहिणींला
मागणं समस्त भाऊ रायाला
भाऊ बांधील विचाराला…
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055






Be First to Comment