रक्षाबंधन रक्षाबंधन
बहिणीसाठी नसतो फक्त हा सण
भावाची माया आणि सुरक्षेचं धन
आला भावा-बहिणीच्या प्रेमाचा सण.
रक्षाबंधन रक्षाबंधन
साडी नको-पैसा नको ओवाळणी मला नको
दादा तुझ्यासाठी माझा,जीव तीळ-तीळ तुटतो
तू फक्त सुखी रहा सांगते अंतःकरण
आला भावा-बहिणीच्या प्रेमाचा सण.
रक्षाबंधन रक्षाबंधन
बाप आणि आई तूच सर्व-काही,
तुझ्याविना माझा कोणीच नाही
पवित्र हे नातं पाण्यासारखं मन,
स्वार्थासाठी तर असतो प्रत्येकजण
आला भावा-बहिणीच्या प्रेमाचा सण.
माहेर सुटलं सासर धरलं गेली नाही आठवण,
एका उदरात जन्मलो,एका घरात वाढलो आपण,
तुझ्या सुखासाठी झूरते माझे मन,
आला भावा-बहिणीच्या प्रेमाचा सण.
रक्षाबंधन रक्षाबंधन
रक्षाबंधन रक्षाबंधन
राखीच्या या सणाला दादा तू जागशील का?
मनापासून मागतो तुला ओवाळणी देशील का?
दिसेल कोणी अबला जर, तिचे रक्षण करशील का?
खूप आहेत बहिणी इथे,त्यांच्यात मला बघशील का ?
विश्वात मोठा होईल हा सण
आला भावा-बहिणीच्या प्रेमाचा सण.
रक्षाबंधन रक्षाबंधन
अजय शिवकर
केळवणे पनवेल
७९७७९५०४६४






Be First to Comment