उलवे नोड येथे शिवसेना – युवासेनेचा विकास कामांचा धूमधडाका
सिटी बेल • उरण • सुनिल ठाकूर •
माजी आमदार व जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांच्या माध्यमातून सेक्टर ८ येथे सुसज्ज असे बस स्थानक सेक्टर १७ ,प्लॉट नंबर १८४ च्या समोर तरुण युवा मंडळी आणि जेष्ठ नागरिक ह्यांच्यासाठी युवा कट्टा तसेच सेक्टर ५ येथे वाचनालय ह्यांचे लोकार्पण सोहळा संपन्न करून स्थानिक पातळीवर आपल्या पक्षाचे नाव पुन्हा एकदा मोठे केले. त्याप्रमाणे कामकाजाला सुरुवात तर झालीच आहे पण यापुढे लोकार्पण सोहळा साजरा न करता लोकत्सव साजरा करुया असेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना मनोहरशेठ भोईर ह्यांनी समस्त युवा तरुणांना व शिवसेना पदाधिकारी ह्यांना खूप सुंदर मार्गदर्शन केले व पक्षासाठी प्रत्येक कार्यकर्ते कसे महत्वाचे असतात तसेच प्रत्येकाची एकजूट पक्षासाठी कशी व किती महत्वाची असते हेही सांगितले. आणि भविष्यात उलवे नोड व तसेच ग्रामीण भागात लोकोपयोगी कामे चालूच राहतील असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ मंगल पाटील, पनवेल तालुका संघटक मर्फी शेठ,पनवेल तालुका अधिकारी गौरव म्हात्रे, युवासेना शहर अधिकारी निलेश पाटील , उप शहर प्रमुख अशोक सर , सेक्टर १७ शाखा प्रमुख विनोद पाटील , मोरावे सेक्टर २,३,५ शिवसेना शाखा प्रमुख शान पाटील, उलवे शहर चिटणीस निलेश म्हादे, समन्वयक राजेश सिंग, प्रतीक घरत तसेच शिवसेना व युवासेननेचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.











Be First to Comment