शंभो,हर हर
कैलास निवासी रुद्रा
शिवशंभु हर तू
पार्वती रमणा ध्यानयोगी
महादेव हर तू
आदिदेव त्रिनेत्रधारी
ओंकाराचा दाता तू
पंचवदनी पिनाकपाणी
त्रैलोक्याचा अधिपती तू
ध्यानधारणा तुला आवडे
नमः शिवाय मंत्रात तू
त्रिपुंड्र भाळी डमरू हाती
भस्म विभूषित हर तू
चंद्रशेखरा शेषनाथा
त्रिशूलधारी शंभू तू
शुभ्र गंगा माथ्यावरती
निळकंठ शिवशंकर तू
नेत्र तुझे मिटलेले गूढ
शिवालयी नादमय तू
बारा ज्योतिर्लिंग विराजित
ज्योतिर्मय तेजोमय तू
श्रावणात शिवपिंडी पूजा
बिल्वपत्राने पावतोस तू
” ओंम नम:शिवाय” मंत्राने
मनोकामना पुरविशी तू.
सुजाता खरे






Be First to Comment