Press "Enter" to skip to content

डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य

श्री.सदस्यांनी शेडवली फाटा येथे फुलवली वनराई : २४८ वृक्षांना मिळाली नवसंजीवनी

सिटी बेल • काशिनाथ जाधव •
पाताळगंगा •

डॉ. श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या माध्यमातून तसेच आप्पासाहेब धर्माधिकारी सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षी खालापूर तालुक्यातील शेडवली फाटा या ठिकाणी वृक्षांची लागवड वनविभागाच्या जागेत करण्यात आल्याने वर्षाचे बारा महिने या वृक्षांची स्वच्छता आणी संवर्धन करीत असल्याचे श्री सदस्यांनी सांगितले.

आज हे वृक्ष डौलाने उभे राहिले आहेत.वृक्षांची लागवड आणी संवर्धन बरोबर वृक्षांना औषधी फवारणी, खते, झाडांच्या मुळा जवळ माती देणे, वृक्षांच्या बाजूला वाढलेले गवत काढून गुरांपासून या वृक्षांचे संरक्षण व्हावे यासाठी झाडांभोवती कुंपन,तसेच तारेचे कुंपन घालणे.आदि कामे श्री सदस्य मनापासून करीत करीत आहे.त्याचा बरोबर या वृक्षांना क्रमांक देण्यात आल्याने प्रत्येक सदस्य स्वताजवळ असलेली पदवी विसरून या कार्यासाठी हातभार लावत आहे.

यामुळे या ठिकाणी सध्या वनराई फुलल्याचे चित्र पहायला मिळत आहे.श्री सदस्य यांनी या ठिकाणी असलेली पडीक विहीरीचा वापर वृक्षांना पाणी देण्यासाठी उपयोगात आनले आहे.या ठिकाणी पाण्याची साठवण म्हणून ५००० लिटर च्या क्षमतेची टाकी बसविण्यात आली असून वृक्षांना पाणी देणे सोयस्कर ठरत आहे.

आठवड्यातील तीन ते चार दिवस या ठिकाणी श्री सदस्य वृक्षांचे संवर्धन करीत असतात. सध्या या ठिकाणी पिंपळ ,निलगिरी कडूनिंब,तान्हन, करंज,अर्जुन,रीठा,सफकर्णी,कुंतजिवा,निंबारा,रेनट्री,वड,गुलमोहर ,ऑस्ट्रोलियन,सुबाबुल,बेहडा,या सारख्या वृक्षाची लागवड करण्यात आली असून संवर्धन केले जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.