सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा #
धागा... मैत्रीचा !
धागा मित्रत्वाचा एकेरी नसावा
बळकटी येण्यास दुहेरी असावा....
बाजू एकमेकांच्या दोघांनी सावराव्या
अंधारात उजेडाच्या वाटा दाखवाव्या...
सुखदुःख जाणतात परम-घनिष्ठ मित्र
प्रसंगी धावुनी येतात नाती - यार - मित्र...
नाते मित्रत्वाचे अनमोल - पवित्र
जपणूक करती जे तेच जिवलग मित्र...
मित्रत्वाच्या भावनेने शुभेच्छा तुम्हाला
आपला एक मित्र समजावे मला...!!
©® कविश्री- अरुण दत्ताराम म्हात्रे.
नवी मुंबई मो.-9987992519






Be First to Comment